वेळेनुसार तंत्रज्ञानामध्ये सुद्धा फार मोठा बदल घडत गेला आणि इंटरनेटचं जाळं फोफावलं. पारंपरिकता लक्षात ठेवतं या माध्यमातून सुद्धा ग्राहकांपर्यंत पोचण्याचं श्री.संकेत व श्री.संजोग या खामकर बंधूंनी ठरवले. चविष्टता तर आहेच पण बाजारात मिळणाऱ्या इतर मसाल्यांपेक्षा आपले मसाले खुप वेगळे आणि आजच्या ग्राहकांच्या पसंतीस पडावे ह्या उद्देशाने काही अमुलाग्र बदल केले गेले. ग्राहकांच्या सोईप्रमाणे त्यांना मसाले मोफत घरपोच करू जाऊ लागले. शिवाय फ्लिपकार्ट व अमेझॉनद्वारे संपूर्ण भारतातील अस्सल खवय्या जी. डब्ल्यू. खामकर मसाले ऑर्डर करू लागला. गृहिणीला लागेल तसा व अगदी घरगुती पद्धतीचा मसाला शहरात सुद्धा मिळत असल्यामुळे जी.डब्ल्यू.खामकर मसाले मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे दुकान मानले जाते. ८६ वर्षापासून चालत आलेली तिचं चव आज हि जी.डब्ल्यू.खामकर परिवार ग्राहकांना आनंदाने पुरवत आहेत.

लालबागच्या जी.डब्ल्यू.खामकर मसाल्यांची वैशिष्ट्ये..
- १) पारंपरिक पद्धतीने बनवलेले मसाले.
- २) १००% नैसर्गिक मसाले.
- ३) अस्सल उखळीवर कुटलेले मसाले.
- ४) ग्राहकांच्या पसंतीनुसार ऑर्डरप्रमाणे मसाले भाजून व कुटून दिले जातात.
- ५) जेवण बनवताना जी.डब्ल्यू.खामकर मसाल्याव्यतिरिक्त इतर कोणत्या ही गोष्टी उदा.(धने, हळद, मिरची पावडर, गरम मसाला) टाकण्याची आवश्यकता नाही.
- ६) कुटूंबाच्या तिसऱ्या पिढीप्रमाणे ग्राहकांचीही तिसरी पिढी मसाला घेऊन जाते आहे.
- ७) संपूर्ण महाराष्ट्रातील गेली ८६ वर्ष मसाला क्षेत्रातील अग्रगण्य नाव.
We are now available on

