HTML5 Shim and Respond.js IE8 support of HTML5 elements and media queries WARNING: Respond.js doesn't work if you view the page via file:// [if lt IE 9]>

मसाले जास्त काळ टिकवण्यासाठीचे उपाय

1261
आपल्या दररोजच्या जीवनात दोन गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे.एक म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे जेवण, आणि जेवण म्हटलं की मसाले आलेच. आज अनेक कारणास्तव आपल्याला घरात मसाल्याची साठवण नीट करता येत नाही, किंवा मसाले खराब होण्याच्या अनेक तक्रारी पहायला मिळतात. जाणून घ्या मसाला खराब होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. दोन माणसांना, दोन शहरांना, दोन देशांना कळत नकळत एकमेकांच्या जवळ आणणारी गोष्ट म्हणजे जेवण. ज्या प्रमाणे इंधनाविना एखादी गाडी सुरु होऊचं शकत नाही त्याच प्रमाणे चविष्ठ मसाल्यांविना रुचकर जेवणाची गाडी पुढे जाऊचं शकत नाही. भारत देशाला वेगवेगळे मसाले बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थाच्या व्यापाऱ्यांचा इतिहास आहे. पूर्वी महिला वर्ग आपल्या सोईनुसार आपल्या स्वतःच्या आवडीनुसार मसाला करीत असत.

पारंपरिक पद्धतीने वेगवेगळे मसाल्याचे जिन्नस छान भाजून, तळून उखळीवर कुटून १०० टक्के नैसर्गिक गुणधर्म असलेला मसाला तयार होई. मागील काही वर्षात बदलत्या काळानुसार व तंत्रज्ञाना प्रमाणे मसाला बनवण्याची पद्धतही बदलत गेली.अनेक कंपन्यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार, चवीनुसार व प्रांतानुसार मसाले बनवण्यास सुरुवात केली. मात्र बदलत्या जीवनशैली प्रमाणे व धकाधकीच्या जीवनात तोच पारंपरिक १०० टक्के नैसर्गिक चव असलेला मसाला विरळ होताना दिसत गेला. गेली ८६ वर्ष लालबागमधील जी.डब्ल्यू.खामकर मसाले अस्सल उखळीवर पारंपरिक पद्धतीने कुटलेला मसाला ग्राहकांना देत आहेत. "आमचे मसाले बनवी तुमचे खाणे लज्जतदार " या प्रमाणे अस्सल उखळीवर कुटलेला मसाला जेवणात जो स्वादिष्टपणा, रुचकरता आणेल अशी चव जी.डब्ल्यू.खामकर मसाला देतो आहे. उखळीवर कुटलेल्या मसाल्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. उखळीवर कुटलेला मसाला हा हॉट प्रेस मसाल्यापेक्षा अधिक काळ टिकतो. त्याचबरोबर काळानुरूप मसाल्याची चव, सुगंध व त्याचा मूळ गुणधर्म तिखटपणा कमी कमी होत असतो. मात्र उखळीवर कुटलेल्या मसाल्याची चव, व सुगंध हा कायम टिकून राहतो.गेली ८६ वर्ष अविरतपणे जी.डब्ल्यू.खामकर समुह ग्राहकांच्या तिसऱ्या पिढीला आपले अस्सल पारंपरिक मसाले देत आहेत."जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म " या अन्नाला पुर्णत्वास नेण्याचं काम हे मसाले करत असतात.त्यामुळे जेव्हा कधी घरी गरज भासेल मसाल्याची, तेव्हा जरूर घरी आणा जी.डब्ल्यू.खामकर मसाला..


मसाले जास्त काळ टिकण्यासाठी काय करावे...

 • १) मसाले काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवावे
 • २) मसाले नेहमी कोरड्या ठिकाणी ठेवावे
 • ३) पाणी असलेल्या ठिकाणी मसाले ठेऊ नये.
 • ४) मसाल्याच्या बरणीचे झाकण नेहमी घट्ट लावावे.
 • ५) मसाल्याला ओला हाथ लावू नये.
 • ६) मसाले नेहमी बरणीमध्ये दाबून भरावे आणि झाकण घट्ट लावावे.
 • ७) मसाले जास्त काळ टिकवण्यासाठी तीन भागात काळ्या हिंगाचा खडा ठेवावा. (मसाल्याच्या वरच्या भागात,मध्यभागी,खालच्या भागात)
 • ८) नेहमी वापरातील मसाले वेगळे काढून घ्यावे आणि त्यांचे चमचे वेगवेगळे ठेवावे.
 • ९) मसाले फ्रिजमध्ये देखील ठेवले तरी चालतात त्यामध्ये त्याची शेल्फ लाईफ वाढते.

लालबागच्या जी.डब्ल्यू.खामकर मसाल्यांची वैशिष्ट्ये..

 • १) पारंपरिक पद्धतीने बनवलेले मसाले.
 • २) १००% नैसर्गिक मसाले.
 • ३) अस्सल उखळीवर कुटलेले मसाले.
 • ४) ग्राहकांच्या पसंतीनुसार ऑर्डरप्रमाणे मसाले भाजून व कुटून दिले जातात.
 • ५) जेवण बनवताना जी.डब्ल्यू.खामकर मसाल्याव्यतिरिक्त इतर कोणत्या ही गोष्टी उदा.(धने, हळद, मिरची पावडर, गरम मसाला) टाकण्याची आवश्यकता नाही.
 • ६) कुटूंबाच्या तिसऱ्या पिढीप्रमाणे ग्राहकांचीही तिसरी पिढी मसाला घेऊन जाते आहे.
 • ७) संपूर्ण महाराष्ट्रातील गेली ८६ वर्ष मसाला क्षेत्रातील अग्रगण्य नाव.