झटपट आणि चटपट

सध्या सर्वांनाच वेळेआधी चालायचं आहे. आत्ताचा काळ हा वेगवान गोष्टी करण्याचा व आत्मसात करण्याचा आहे. क्षेत्र कोणतंही असो, सर्व गोष्टी या झटपट व्हाव्या असं आपल्याला वाटत असतं. मग यामध्ये जेवण ही आलंच. काळ बदलला तसतसा जेवण बनवण्याच्या पद्धतीतही बदल होत गेला. पूर्वी लोक जेवण बनवण्यासाठी विशेष असा वेळ राखून ठेवत असत, महिलावर्ग फार रुची घेऊन सर्व कुटूंबासाठी जेवण करत, आजही अनेक लोकांच्या तोंडी "आमच्या वेळच्या जेवणाची चव आत्ताच्या पदार्थांना कुठे?" हे वाक्य सर्रास ऐकायला मिळतं. त्याचप्रमाणे घरातील आजी, आजोबा जुनी जाणती मंडळी त्यांच्या काळातल्या पदार्थांचे, वेगवेगळ्या मसाल्यांचे, पौष्टिकतेचे दाखले देताना पाहायला मिळतात. अनेक महिलांना, लोकांना आजही प्रश्न पडतो की अनेक काळापासून चालत आलेली पारंपरिक चव आपल्या पदार्थांना का नसते? "आमची मुलं गावी गेली की अमुक अमुक पदार्थ फार आवडीने खातात, पण तोच पदार्थ इथं घरी केला की नाक मुरडतात.. मला तर कळतच नाही काय करावं"? असे संवादही महिलांच्या घोळक्यांमध्ये कानी पडतात. या गोष्टींना कारणं पण तशीच आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण अनेक अशक्य अशा गोष्टी शक्य करायला लागलो. आपल्या जीवनातील सर्व गोष्टी या तंत्रज्ञानासोबत जोडायला लागलो. मात्र या सर्व गोष्टी करताना आपल्या जीवनातील मूलभूत गोष्ट अन्न, याकडे आपण आपल्या सोईनं दुर्लक्ष केलं, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

        एका सर्वेनुसार भारतीय आपल्या उत्पन्नामधील सर्वाधिक रक्क्म ही जेवण, अन्न, किराणा माल या गोष्टींवर खर्च करताना दिसतात. मात्र त्या बदल्यात आजही भारतीयांना हवं तसं पौष्टिक जेवण मिळताना दिसत नाही. जेवण म्हटलं की मसाले हे आलेच. एखाद्या पदार्थाला, जेवणाला स्वादिष्ट, रुचकर बनवण्याचं काम मसाले करत असतात. ज्या प्रमाणे साखरेचा गुणधर्म आहे, कोणत्याही गोष्टीत एकजीव होऊन त्या गोष्टीला गोडवा आणणे, त्याचप्रमाणे मसाल्यांचा गुणधर्म आहे, की कोणत्याही पदार्थात एकजीव होऊन त्याला रुचकर व चविष्ट बनवणे. अनेक वेळा महिला वर्गाची जेवणाच्या नावडतेपणाविषयी तक्रार असते. त्याचं मुख्य कारण हे मसाला असू शकतं. धकाधकीच्या जीवनात अनेक वर्षांपासून चालत आलेली पारंपरिक चव व दर्जेदार मसाल्यांची उत्पादनं संपूर्ण महाराष्ट्रात वितरित करणारं एकच नाव आहे. ते म्हणजे लालबागचे जी. डब्ल्यू. खामकर मसाले! आजकाल काम आणि इतर व्यापामुळे लोकांना कमीत कमी वेळेत जेवण बनवावं लागतं, अशा वेळी चव, पौष्टिकता व रुचकरपणा या गोष्टींना जेवताना बगल द्यावी लागते. परंतु गेली ८६ वर्षे पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या मसाल्यांना आधुनिकतेची जोड देत खामकर कुटुंबाची तिसरी पिढी ग्राहकांच्याही तिसऱ्या पिढीला रुचकर जेवणासाठी मसाला पुरवतं आहे. तुमच्या जेवणात आमच्या मसाल्यांव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी (उदा : धने,हळद,मिरची पावडर,गरम मसाला) टाकण्याची आवश्यकता नाही, हेच जी. डब्ल्यू. खामकर मसाल्यांचे वैशिष्ट अधोरेखित करण्यासारखे आहे. कमी वेळेत तुमच्या जेवणाला पारंपरिक चव आणि खमंगपणा आणण्यासाठी जी. डब्ल्यू. खामकर मसाले पटाईत आहेत. त्यामुळे वेळ कितीही वेगाने जाऊ द्या "घरी असेेल जी. डब्ल्यू. खामकर मसाला, तर जेवणाची चिंता कशाला..?"


लालबागच्या जी.डब्ल्यू.खामकर मसाल्यांची वैशिष्ट्ये..

 • १) पारंपरिक पद्धतीने बनवलेले मसाले.
 • २) १००% नैसर्गिक मसाले.
 • ३) अस्सल उखळीवर कुटलेले मसाले.
 • ४) ग्राहकांच्या पसंतीनुसार ऑर्डरप्रमाणे मसाले भाजून व कुटून दिले जातात.
 • ५) जेवण बनवताना जी.डब्ल्यू.खामकर मसाल्याव्यतिरिक्त इतर कोणत्या ही गोष्टी उदा.(धने, हळद, मिरची पावडर, गरम मसाला) टाकण्याची आवश्यकता नाही.
 • ६) पारंपरिक पद्धतीने मसाले निर्मितीचा तीन पिढ्यांचा अनुभव.
 • ७) संपूर्ण महाराष्ट्रातील गेली ८६ वर्ष मसाला क्षेत्रातील अग्रगण्य नाव.
  
  
  
  
  
  
  
Our Address

Shop no. 3, 43/45D, Lalbaug Market, Dr. Ambedkar Road, Lalbaug, Mumbai 400012

Our Links
 • Thane
 • Virar
 • NowFloats
 • follow us
  COPYRIGHT @ 2016. ALL RIGHTS RESERVED. G W KHAMKAR SPICES (KHAMKAR MASALA).